RAJE............!!!!!!!!

!!!!!!!......JAI BHAWANI...JAI SHIVAJI...!!!!!!!

!!!!!!!......SHIVAJI MAHARAJ......!!!!!!!





हृदय अजून मराठी आहे.....

हृदय अजून मराठी आहे

विदेशी कपडे घातले तरी
हृदय अजून मराठी आहे
तोडून तुटत नाहीत
या मजबूत रेशीम गाठी आहेत
पिझा, बर्गर खाल्ल्यावरही
पोट पुरणपोळीच मागतं
ईंग्रजी पुस्तकं वाचली तरी
मन मराठी चारोळीच मागतं
मात्रुभूमि सोडली की
आईपासून दूर गेल्यासारखं वाटतं
भाषा सोडली की
अस्तित्व हरवल्यासारखं वाटतं
वडाची झाडं मोठी होऊनही
परत मात्रुभूमिकडे झुकतात
कितीही दूर गेलं तरी
पाय परत मात्रुभूमिकडेच वळतात
काहीही बदललं तरी
हृदय अजून मराठी आहे
तोडून तुटत नाहीत
या मजबूत रेशीम गाठी आहेत...

छत्रपति शिवाजी महाराज...!!!


या हिंदुस्थानला जिजाऊचा शिवबा पाहिजे !
`अधर्माचा अंधार दाट आहे ।
धर्मरक्षणाचा दिवा पाहिजे ।।
या हिंदुस्थानला जिजाऊचा शिवबा पाहिजे ।।१।।

नेते झाले अफझलखान ।
काश्मीरचे केले त्यांनी स्मशान ।।
आतंकवादरूपी शाहिस्तेखानाची बोटे छाटणारा पाहिजे।।
या हिंदुस्थानला जिजाऊचा शिवबा पाहिजे ।। २ ।।

या देशातील तरुण झाले यवनांचे भक्‍त ।
हिंदूंच्या तलवारींवरती हिंदूंचेच रक्‍त ।।
हिंदुस्थानावर हिंदूंचा दावा पाहिजे ।
आता पुन्हा एकदा `हर हर महादेव'ची हवा पाहिजे ।।
या हिंदुस्थानला जिजाऊचा शिवबा पाहिजे ।। ३ ।।

आयुष्य असचं जगायचं असतं......!!!!!!!!!

जे घडेल ते सहन करायचे असतं, बदलत्या जगाबरोबर बदलायचं असतं


आयुष्य असचं जगायचं असतं

कुठून सुरु झालं हे माहीत नसलं तरी, कुठतरी थांबायचं असतं,

आयुष्य असचं जगायचं असतं

कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं, स्वत च्या सुखापेक्षा इतरांना सुखवायचे असतं

आयुष्य असचं जगायचं असतं

दु ख आणि अश्रुंना मनात कोडुन ठेवायचं असतं, हसता नाही आलं तरी हसवायचं असतं,

आयुष्य असचं जगायचं असतं

पंखामध्ये बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं, आकाशात झेपावुनही धरतीला विसरायचं नसतं,

आयुष्य असचं जगायचं असतं


मरणानं समोर येउन जीव जरी मागितला तरी मागुन मागुन काय मागितलसं असचं म्हणायचं असतं,

आयुष्य असचं जगायचं असतं


इच्छा असो वा नसो जन्मभर वाकायचं असतं, पणं जग सोडताना मात्र समाधानानं जायचं असतं,

आयुष्य असचं जगायचं असतं

मैत्री.......!!!!!!!

जिथे बोलण्यासाठी "शब्दान्ची" गरज नसते,

आनन्द दाखवायला "हास्यची" गरज नसते,
दुःख दाखवायला "आसवान्ची " गरज नसते,
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते

ति म्हणजे " मैत्री
जो रक्ताची नातीच काय पण परक्याला पण खेचून आणतो

आपल्या ही मनाला तो जवळचा करून ठेवतो
आपल्या सुख दु:खात तो स्वत:ला सामावून घेतो

हीच मैत्री .......तो विश्वाचा एक धागा असतो
जे जोडले जाते ते नाते
जी जडते ती सवय
जी थांबते ती ओढ
जे वाढते ते प्रेम
जो संपतो तो श्वास
पण निरंतर राहते ती मैत्री
फ़क्त मैत्री........... !!!!!!!!

मैत्री.......!!!!!!!

काही माणसे असतात खास

काही माणसे असतात खास
जि मैत्रीने खांद्यावर हात टाकतात,
दुःख आले जिवनात तरीही
कायम साथ देत राहातात.

काही माणसं मात्र
म्रुगजळाप्रमाणे भासतात,
जेवढे जवळ जावे त्यांच्या
तेवढेच लांब पळत जातात.

काही माणसे ही गजबजलेल्या
शहरासारखी असतात,
गरज काही पडली तरच
आपला विचार करतात,
बाकीच्या वेळी ति सारी नाती विसरतात
काही हवे असेल स्वतःला तर तुम्हाला मित्र मित्र करतात.

मात्र काही माणसं ही
पिंपळाच्या पानासारखी असतात,
जाळी झाली त्यांची तरी मनाच्या
पुस्तकात आयुष्यभर जपून ठेवाविशी वाटतात

मुलगा मराठी .....

मराठी मुलगा....

कंपनीत अनेक मुले असतात
पण जो सर्वात साधा सुधा दिसतो
तो मराठी मुलगा असतो !!

कंपनीत अनेक मुले असतात
पण जो सर्वांना सतत मदत करीत असतो
तो मराठी मुलगा असतो !!

कंपनीमध्ये मुले पिज़्ज़ा बर्गर खातात
पण जो नेहमी वडा पाव खातांना दिसतो
तो मराठी मुलगा असतो !!

कंपनीत मुले सिगरेट पिऊन येतात
पण जो घरुन पुजा करुनच येतो
तो मराठी मुलगा असतो !!

कंपनीमध्ये मुले मुलींना प्रोपोज करतात
पण जो आवडत्या मुलीला फ़क्त चोरुनच पहात असतो
तो मराठी मुलगा असतो !!

ओर्कुट वर अनेक मुले असतात,
पण जो मित्रांना स्क्रॅप मध्ये (प्रेमाने) शिवी घालुन,
मुलींशी मात्र सभ्य भाषेत बोलतो ,
तो मुलगा मराठी असतो...

ऑनलाईन अनेक मुले असतात,
पण जो ओफिस चे काम नीट करुन,
मित्र परिवाराशीही बोलतो,
तो मुलगा मराठी असतो...

मेल FWD अनेक मुले करतात,
पण जो मुलींना embarassing वाटेल असे कही FWD करत नाही,
तो मुलगा मराठी असतो...

चाट वर मोबाईल नंबर अनेक मुले मागतात,
पण जो 'I Respect your Privacy'म्हणून,
मुलींना फोर्स करत नाही,
तो मुलगा मराठी असतो.

एक मुलगी ....

एक मुलगी मला आवडली

तुम्हाला सांगतो ती इतकी आवडली ना
कि चोहिकडे मला फक्त तिच दिसू लागली..

वेळ वाया जात आहे किती
तिला मनातले सांगेनच ह्याची नाही शाश्वती
पण मनात होती भीती म्हणाली असती
मित्रा, हे तर होतय फारच अति

कॉलेज संपले
नोकरी सुरू झाली
तसा थोडा तिचा विसर पडला
अन अहो भाग्य!! आज ति चक्क समोर आली

आली होती माझ्या कंपनीमध्ये
मुलाखत देण्यास
आणि मि होतो तिथे
तिची मुलाखत घेण्यास

मुलाखत सोडली
आणि गेलो कॉफी प्यायला
विचारले तिला आहेस एकटी
कि आहे कोणी तुझा दादला..?

तिचा बोलका चेहरा सर्व काही सांगून गेला
जणू चातकाचा कौल पावसाने स्विकारला
तो चेहरा माझी ओढ अजुनच वाढवून गेला
आणि माझ्या मनाचा मोर पिसारा फुलवून तिथेच नाचू लागला.

मनाने पुढाकार घेतला
आणि वाणिने त्यास प्रतिसाद दिला
एकदा सांगितले तिला माझ्या मनातले
आणि केले इतक्या वर्षाचे अस्वस्थ मन मोकळे..

ति हलकेच लाजली आणि तिच्या गालावरील खळी
माझ्या अंतर्मनाने ओळखली
ति म्हणाली किती वेळ लावलास तु…?
कॉलेजमध्ये असताना मला पण आवडत होतास तु…

अरे नशिबा कसला हा खेळ खेळलास

युगान युग दुर ठेवून शेवटी आम्हास मिळवलास.....

...काळीज रडतंय

मी म्हंटल "अगं मी काहीही करेन तुझ्यासाठी

तुला हसतं पाहण्यासाठी,तुझी आस्व पुसण्यासाठी
तू फक्त होय म्हण ग,जीव तुझ्यातच गुंतलाय सारा "

तिनेही लाजत म्हंटल "हो राजा मी तुझीच आहे रे,
माझ्याही श्वासाला गरज तुझीच आहे रे"

मग कसं कोण जाने,ती माझ्या मिठीत विरून गेली,
विर्घळूनच गेली, अगदी माझ्याही नकळत!!

आता मी मी राहिलो नव्हतो,न ती ती उरली होती
दोघानाही आता ओढ लग्नाची लागली होती..

मग न जाने का , नजर माझीच लागली .....

मी तिला अचानक माझ्या लग्नाची खबर सांगितली
अन थोड्याच वेळात रूम तिची गाठली, पत्रीकेसोबत

त्या भाबडीने हात तिचा कापला होता ..
मी जाण्यापूर्वी श्वास कधीच सोडला होता...

पुन्हा येऊन पाहून जा ग
पत्रिका आहे आपल्याच लग्नाची ..
सोंग केलं होतं ग मी सारं...
फक्त तुला जळवण्यासाठी ..
ग प्रिये थोडं जळवण्यासाठी..

आज तिच्या प्रेतासोबत
माझंही प्रेत जळतंय...

जीव सोडला आहे....
तरीही काळीज रडतंय...
काळीज रडतंय.....
No posts.
No posts.